Celebrity Interview : बदल आत्मसात करा !
एखादा कलाकार रंगभूमीशी जोडला गेला की तो कायमचा रंगभूमीचाच होऊन जातो. रंगभूमीशी जोडलेली त्याची नाळ आयुष्यभर राहते. मग त्या नटाला कॅमेर्याने कितीही भूरळ घातली तरीही तो पुन्हा रंगभूमीवर परततोच. गेल्या 26 वर्षांपासून अभिनय क्षेत्रात वावरणार्या संजय नार्वेकर यांची यंदा नाटकाची पंचविशी आहे. म्हणजेच 2019 वर्षात संजय नार्वेकर करिअरचं रौप्य महोत्सवी साजरं करत आहेत. ‘होते कुरूप वेडे’ या नव्या नाटकातून संजय नार्वेकरांनी नव्या वर्षाची सुरुवात केली असून या नाटकाच्या निमित्ताने आम्ही त्यांच्याशी गप्पा मारल्या.
नव्या वर्षात नवं नाटक...
8 प्रेक्षकांची नव्या वर्षाची सुरुवात आनंदाने व्हावी याकरता आम्ही नवंकोरं धम्माल विनोदी नाटक घेऊन आलो आहोत. होते कुरूप वेडे या नव्या नाटकातून लोकांना आनंद देण्याचा प्रयत्न करणार आहोत. या नाटकातून प्रेक्षकांना खळखळून हसवण्याचा प्रयत्न आमच्याकडून असणार आहे.
रंगभूमीवरचं पंचविसावं नाटक...
8 पंचवीस वर्ष मी रंगभूमीची सेवा करू शकलो याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतो. लोकांनी माझ्या कामाचं कौतुक केलं, प्रेम केलं म्हणूनच मी पंचवीस वर्ष या नाटकक्षेत्रात उभा राहू शकलो. प्रेक्षकांनी, रसिकांनी दिलेल्या प्रेमामुळेच मी माझं पंचविसावं नाटक जोमाने करू शकतोय. नाट्यक्षेत्रात आणखी बरेच प्रयोग करायचे आहेत. ज्या रंगभूमीनं मला ओळख दिली त्या रंगभूमीसाठी मला आणखी काम करायचं आहे.
पंचवीस वर्षात रंगभूमीत सकारात्मक बदल...
8 प्रत्येक क्षेत्रात बदल होत राहतात. मराठी रंगभूमीही गेल्या 25 वर्षांत प्रचंड बदलली. त्यामुळे या बदलाचा मला साक्षीदार होता आलं. हे बदल आपण स्विकारले पाहिजेत. आत्मसात केले पाहिजेत. काळानुसार स्वतःला अपडेट केलं तरच आपण पुढे जाऊ शकतो. बदल हा एक प्रोगेसिव्ह प्रकार आहे. आणि स्वतःला प्रोगेसिव्ह पाहायचं असेल तर काळानुसार सुसंगत झालं पाहिजे.
राजेश देशपांडे सच्चा मित्र...
8 या नाटकाचे लेखक, दिग्दर्शक राजेश देशपांडे यांचंही लेखक, दिग्दर्शक, अभिनेता म्हणून पंचविसावं नाटक आहे. त्यामुळे या नाटकाच्या निमित्ताने आम्ही दोघेही पंचविशीत पदार्पण करतोय. राजेश माझा सच्चा मित्र असल्याने त्याच्यासोबत काम करताना नेहमीच मज्जा येते. आम्ही याआधीही खूप कामे केली आहेत, त्यामुळे त्याला काय हवंय ते मला समजतं आणि ते मी माझ्या कामातून देण्याचा प्रयत्न करतो.
स्वतःतील राजहंस ओळखा...
8 होते कुरूप वेडे हे नाटक विनोदी असले तरीही प्रेक्षकांना एक वेगळा संदेश देणारं आहे. आपल्याकडे जे चांगलं आहे, त्यापेक्षा दुसर्यांकडे काय आहे ते जाणून घेण्यासाठी व जे नाही ते मिळवण्यासाठी माणूस नेहमीच धावत असतो, याच मनोवृत्तीवर अत्यंत मार्मिक भाष्य या नाटकाद्वारे करण्यात आलं आहे. आपल्यातील राजहंस ओळखण्याचा सल्ला या नाटकातून प्रेक्षकांना देण्यात आला आहे. प्रेक्षकांमधील सकारात्मक भावना जागृक करण्यासाठी आम्ही विनोदाचा धागा पकडला आणि होते कुरूप वेडे हे नाटक साकार झाले.
![]() |
दैनिक महाराष्ट्र दिनमान |
Comments
Post a Comment