अंतिम वर्षाच्या परीक्षा व्हायलाच हव्यात...


कारण, आपल्याकडे अद्यापही विद्यार्थ्यांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेच्या गुणांकानुसारच उमेदवाराची पात्रता ठरवली जाते. त्यामुळे परीक्षा होणं गरजेचं आहे. त्यासाठी नव्या तंत्रज्ञानाचा वापर व्हायला हवा. शाळा सुरू करता येत नसल्याने ई-स्कूलिंग सुरू होत असेल तर ई-एक्झाम घ्यायला काय हरकत आहे? अन्यथा २०२० बॅचच्या सगळ्या विद्यार्थ्यांवर कोविड बॅचचा ठपका बसेल आणि त्याचा परिणाम त्यांच्या संपूर्ण करिअरवर होईल. यापुढे २०१९-२०२० शैक्षणिक वर्षांत शिकलेल्या विद्यार्थ्यांकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलणार आहे. कोणतीही कंपनी या बॅचमधील विद्यार्थ्यांना कामावर रुजू ठेवण्यास सकारात्मक राहणार नाहीत. त्यामुळे पात्र असलेल्या विद्यार्थ्यांनाही चांगल्या संधीपासून वंचित राहावं लागेल. ई-स्कूलिंगला ज्याप्रमाणे अडचणी निर्माण झाल्यात, त्याचप्रमाणे ई-एक्झामलाही होणार आहेत. मात्र सुरुवातच नाही केली तर तंत्रज्ञानाच्या मर्यादा आणि त्यावरचे उपाय सापडणार नाहीत. आज-आता लगेच परीक्षा व्हायला हव्यात असंही नाही. त्यासाठी आणखी दोन-तीन महिने थांबता येईल, सुरुवातीला प्रायोगिक तत्वावर परीक्षा घेऊन पाहायला हवं. प्रयोगात अडचणींवर मात करता येते. प्रत्यक्षात ऑनलाईन परीक्षा घेतानाही अडचणी निर्माण होतील, मात्र त्यावरही तंत्रकुशल व्यक्तींकडून उपाय निघू शकतो. मात्र सरसकट परीक्षा रद्द करणं योग्य नाही. यामुळे पारंपरिक शिक्षण पद्धतीलाही ब्रेक लागेल आणि विद्यार्थ्यांचं भवितव्यही अंधारात जाण्यापासून वाचेल. बदलत्या तंत्रज्ञानाचा वापर शिक्षण क्षेत्रातच होणार नसेल तंत्रशिक्षणाचा उपयोग काय?
कृपया तज्ज्ञांनी मार्गदर्शन करावं!

Comments