Diwali Festival : तेजोमय दिवाळीचा राजेशाही थाट


diwali festival, kandil making ideas,  how to make kandil from waste,  akash kandil ideas, akash kandil making at home  diwali kandil, aakash kandil making in marathi, akash kandil design,  how to make star akash kandil

रुबाब, राजेशाही, तेजोमय, राजयोगी, नक्षत्र, कोहिनूर ही आकर्षक नावे कोणत्याही हिरजेडित दागिन्यांची नाही तर दिवाळी प्रकाशमान करणार्‍या आकाश कंदिलांची आहेत. कंदिलांना अशी नावे देणार्‍या आणि नावाप्रमाणेच कंदीलेही तयार करणार्‍या हर्षाभि क्रिएशनने भन्नाट कल्पना लढवत आकर्षक आकाश कंदिले तयार केली आहेत. हर्षदा कोळी-साटम आणि अभिषेक साटम या जोडप्याने तयार केलेल्या या कंदिलांना सध्या प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे.
जरीच्या साड्यांचा काठ, खण, कागद, लोकर, दोरा आदींचा वापर करत कंदिले तयार करण्यात आली आहेत. अभिषेक साटम गेल्या सात वर्षांपासून कंदिले घरीच तयार करतोे. वडिलांच्या मार्गदर्शनाखाली त्याने कंदीलनिर्मितीचे शास्त्र शिकून घेतले. त्याचप्रमाणे कल्पकता लढवत त्याने अनेक सृजनात्मक कंदील तयार केले.
diwali festival, kandil making ideas,  how to make kandil from waste,  akash kandil ideas, akash kandil making at home
स्वतःपुरते बनवलेली कंदिले इतरांना प्रचंड आवडू लागली. इतरांनीही त्याच्याकडे अशाच कंदिलांची मागणी केली. म्हणूनच यंदा अभिषेक आणि त्याची पत्नी हर्षदा यांनी मिळून कंदील निर्मितीला सुरुवात केली. आपली पंरपरा जपण्यासाठीच ‘हर्षाभि क्रिएशन’ निर्मित कंदिलांना त्यांनी पारंपरिक टच दिला आहे. कंदीलांना एकदम राजेशाही थाट देण्याकरता त्यांनी भारतीय वस्त्रांचा वापर केला आहे. याविषयी अभिषेक साटम सांगतो की, ‘आपल्या परंपरा आपण जपायलाच हव्यात, पण या परंपरा जपताना आपण पर्यावरणाचेही रक्षण केले पाहिजे. आपल्या परंपरा आणि संस्कृतीतून पर्यावरणाचे रक्षण झाले तरच आपले हे सण सार्थकी लागतील. म्हणूनच प्लास्टिक, थर्माकॉलचे कंदील दारासमोर लावून पर्यावरणाचे तापमान वाढवण्यापेक्षा पर्यावरणपूरक कंदील लावून दिवाळी साजरी केली तरच आपले आयुष्य तेजोमय होईल.’
हर्षदा आणि अभिषेक हे जोडपे पर्यावरणप्रेमी असल्याने त्यांनी नेहमीच पर्यावरणाचा विचार केला आहे. हर्षदाला पूर्वीपासूनच विविध कलाकूसर करण्याची आवड आहे. क्विलिंग पेपरपासून तिने अनेक वस्तू तयार केल्या आहेत. त्यातूनच तिने तिची ही कल्पकता कंदील निर्मितीसाठीही वापरली.
diwali festival, kandil making ideas,  how to make kandil from waste,  akash kandil ideas, akash kandil making at home
‘राजयोगी’, ‘तेजोमय’ कंदिलात त्यांनी साडीचा वापर केला आहे. आकाश कंदिलासाठी आजवर कागदाचा किंवा प्लास्टिकचा उपयोग करण्यात आला. मात्र हर्षदा आणि अभिषेकच्या कल्पकतेतून त्यांनी आकाश कंदिलासाठी साडीचा वापर करून घेतला. ‘रुबाब’ आणि ‘राजेशाही’ कंदिलांसाठी त्यांनी खणाचा वापर केला आहे. खण म्हणजे आपल्या पारंपरिक वस्त्रांपैकी एक. म्हणूनच त्यांनी मुद्दाम आकाश कंदिलाच्या मधल्या त्रिकोणांमध्ये खणांचा वापर केलाय. ‘कोहिनूर’ आणि ‘श्रीमंत’ कंदील प्रकारात त्यांनी वुली पेपर म्हणजेच लोकर कागदाचा वापर केला आहे. सोबतच दोर्‍यांचाही वापर करण्यात आलाय. तर, नक्षत्र हा कंदिलाचा प्रकार लहान स्वरुपातला असून त्यासाठी विविध रंगीबेरंगी कागदांचा वापर केला आहे.
कंदील निर्मितीविषयी माहिती सांगताना हर्षदा सांगते की संपूर्ण एक कंदील तयार करायला आम्हाला दीड दिवस लागतो. अनेक बारीक-सारीक कलाकूसर कराव्या लागत असल्याने दीड दिवसांचा अवधी एका कंदिलाला द्यावाच लागतो.
diwali festival, kandil making ideas,  how to make kandil from waste,  akash kandil ideas, akash kandil making at home
नक्षत्र कंदिलाची उंची 4 इंचाची आहे, तर इतर कंदिलांची उंची साडेतीन फुट आहेत. हर्षाभि क्रिएशन ग्राहकांना दीड फूट म्हणजेच केवळ आकाश कंदीलाचा वरचा भागही देतात तर ग्राहकांच्या पसंतीनुसार साडेतीन फुटांचा संपूर्ण कंदीलही देतात. ग्राहकांच्या पसंतीनुसारही कंदील तयार करण्यात येत असल्याचे हर्षदा सांगते.
हे कंदील दीर्घकाळ टिकणारे आहेत. त्यामुळे प्रत्येकवर्षी नवे कंदील घेण्याची गरज नाही. या वर्षात कंदील वापरून झाल्यावर ते व्यवस्थित ठेवल्यास पुढचे बरेच वर्ष हे कंदील वापरता येतात. हे कंदील व्यवस्थित ठेवण्याकरताही हर्षाभि क्रिएशनने ग्राहकांची मदत केली आहे. त्यांनी कागदी पिशवी तयार केली आहे. या पिशव्यांमध्येपुढच्या वर्षासाठी कंदीले व्यवस्थित ठेवू शकतात.
पर्यावरण रक्षणाची ओढ आणि सृजनशक्तीचा केलेला वापर म्हणजेच हर्षाभि क्रिएशनचे कंदील आहेत, असे म्हणायला हरकत नाही.
(संपर्क : https://www.facebook.com/harshabhicreation/)





Tags : diwali festival, kandil making ideas, how to make kandil from waste, akash kandil ideas, akash kandil making at home

Comments

Post a Comment