लहान मूर्त्यांनाही खरं सोवळं

लहान मूर्त्यांनाही खरं सोवळं

लालबागचा राजा, चिंचपोकळीचा चिंतामणी अशा मोठमोठया गणपतींना रोज नव-नवीन सोवळं नेसवलं जातं. हे सोवळं पाहणं भक्तांमध्ये आकर्षणाचा विषय असतो. नेसवणा-यांनाही एक वेगळाच मान प्राप्त होत असतो. मात्र लहान मूर्त्यांना खरं सोवळं नेसवलं जात नाही. प्रत्यक्षात सोवळं नेसवलेली मूर्ती अधिक रेखीव दिसते. मात्र लहान मूर्त्यांना खरं सोवळं न नेसवता त्यांना मूर्तीमध्येच कोरीव सोवळं नेसवलं जातं. मात्र लहान मूर्त्यांनाही खरं सोवळं नेसवण्याचा एक नवा पायंडा सूरज मोरे या तरुणाने घातला आहे.
suraj moreलालबागमध्ये राहणारा सूरज मोरे. नेहमी मोठया बाप्पांना आकर्षित, रंगीबेरंगी सोवळे नेसवलेले त्याने पाहिलेत. मग हीच संकल्पना लहान आकारांच्या बाप्पासाठी का नाही? असं या तरुणाला वाटू लागलं. मग त्याने सुरू केला लहान आकारांच्या मूर्तीना सोवळं नेसवण्याचा प्रयत्न. ही संकल्पना सुरू होऊन एकच वर्ष झालं आहे. त्याला गेल्या वर्षी ही कल्पना सुचली.
गेल्या वर्षी त्याने संकल्पनेचा ‘श्री गणेशा’ केला. प्रत्येकाच्या घराघरांत जाऊन त्याने घरगुती बाप्पांना सोवळं नेसवायला सुरुवात केली. तेही अवघ्या काही मिनिटांतच. खरं तर लहान मूर्त्यांना खरं सोवळं नेसवलं जात नाही, त्यांना कोरीव सोवळं असतं. प्रत्यक्षात सोवळं नेसायचा मान फक्त मोठया मूर्त्यांना असतो. मुळात मोठया मूर्त्यांनाही सोवळं नेसवताना खूप मेहनत करावी लागते.
मात्र सूरजच्या मनात ही नवी कल्पना आली की आपण जर लहान मूर्त्यांनाच सोवळं नेसवलं तर? सूरज मोरे अवघ्या काही मिनिटांतच लहान मूर्त्यांना सोवळं नेसवतो. त्यातही सोवळे नेसवणारे पडद्याआड हे सोवळं नेसवतात. परंतु सगळ्यांच्या देखत सूरज झटक्यात बाप्पाला सोवळं नेसवतो. आपला बाप्पा सुंदर, रेखीव दिसावा यासाठी आपण अनेक उपाय करतो. मनमोहक रूप असलेला बाप्पा कोणालाही लगेच आकर्षित करतो. त्यात बाप्पाला हे पारंपरिक आधुनिक टच दिल्याने तो अधिक खुलून दिसेल यात काहीच शंका नाही.
घरची परिस्थिती बेताची असल्याने घरच्यांनी ‘आधी काम कर’ असं बजावलं आहे, त्यामुळे काम करून तो त्याचा छंद जोपासत असतो. सकाळी काम करून रात्री वेळ मिळेल तेव्हा तो बाप्पाला सजवण्याचं काम करत असतो. बाप्पाच्या आगमनाची तयारी सध्या सर्वत्र जोरात सुरू आहे. त्यामुळे अनेक कार्यशाळेत मोठी लगबग पाहायला मिळते.
गेल्या काही दिवसांत जवळपास २०० ते २५० बाप्पांच्या मूर्त्यांना त्याने सोवळं नेसवल्याचं तो सांगतो. हे किचकट काम तो अगदी साध्या पद्धतीने करतो, यामुळे त्याचं प्रत्येकाकडून कौतुक होताना दिसतंय. घरगुती गणपतींना केलेलं हे त्याचं रेखीव काम अनेकांना आवडलं आहेच, मात्र प्रसिद्ध मोठया गणपती मंडळांकडूनही त्याला ऑर्डर्स येत आहेत.
ग्राफीक डिझायनर असलेला सूरज मोरे म्हणतो की, ‘बाप्पाचं खरं रूप म्हणजे परंपरागत चालत आलेलं बाप्पाचं रूप आपण विसरत जात आहोत. बाप्पाला आकर्षित करण्यासाठी विविध पर्याय असले तरी सोवळ्यातच बाप्पा अगदी रेखीव आणि मनमोहक दिसतो यात काही शंकाच नाही.’
सूरजने जपलेला हा पारंपरिक पद्धतीचा वसा अगदीच स्तुत्य आहे. त्यामुळे त्याच्या या नव्या संकल्पनेची दाद आपल्याला द्यायलाच हवी.
संपर्क : सूरज मोरे- ९७७३१५९४१२

Comments

Popular Posts