करिअर ग्राफीक डिझाईनमधलं


जाहिरात, प्रिंटिंग, फोटोग्राफी, अ‍ॅनिमेशन, इंटरनेट अशा विविध गोष्टींसाठी उपयुक्त असणारं ग्राफीक डिझाईन हे करिअर आता तरुणांना अत्यंत महत्त्वाचं वाटू लागलं आहे. त्यामुळे या क्षेत्राकडे वळण्याचे प्रमाणही मोठय़ा प्रमाणात वाढत जाताना दिसतंय.
graphic_design_ideaगेल्या काही वर्षात जाहिरात क्षेत्रातल्या संधी वाढत जात असलेल्या आपल्या निर्दशनास आल्या आहेत. वाढत जाणारं जागतिकीकरण आणि त्याचबरोबर वाढत जाणारी स्पर्धा या सा-या गोष्टींमध्ये आपला व्यवसाय तग धरून राहण्यासाठी लोकांच्या संपर्कात राहणं आवश्यक आहे आणि त्यासाठी सर्वात महत्त्वाचं आहे ते जाहिरात.
आता जाहिरात तयार करताना केवळ सॉफ्टवेअरचं आकलन असणंच गरजेचं नसतं तर त्याचबरोबर कल्पकतेचीही जोड असणे गरजेचं आहे. त्यासाठी लागतं ते ग्राफीक डिझाईनचं ज्ञान. ग्राफीक डिझाईन केल्याने जाहिरात, प्रिंटिंग, फोटोग्राफी, अ‍ॅनिमेशन, इंटरनेट अशा विविध क्षेत्रात तुम्ही करिअर घडवू शकता.
जाहिरात
जाहिरात क्षेत्रात ग्राफीक डिझाईनचं काम महत्त्वपूर्ण असतं. कल्पक आणि आकर्षक जाहिरात बनवायची असेल तर त्यासाठी सृजनशील ग्राफीक डिझाईनच महत्त्वाचा असतो. एखादं काम करण्यासाठी त्यासाठी विविध सॉफ्टवेअर्स वापरावी लागतात. त्यामुळे कोणत्या कामासाठी योग्य ते सॉफ्टवेअर वापरता येणं हे सुद्धा एक कौशल्य आहे.
शिवाय एक जाहिरात बनवण्यासाठीही अनेक सॉफ्टवेअरची गरज लागते. फोटोशॉप, कोरल ड्रॉ, इलेस्ट्रेटर आदी सॉफ्टवेअर केवळ येऊन उपयोगाचं नाही, त्यासोबत ते योग्य वेळी कसे वापरावे याचंही ज्ञान असणं गरजेचं असतं. त्यामुळे ग्राफीक डिझाईन शिकताना तुम्हाला जाहिरात हा विषय त्यात आहे की नाही ते पाहणं गरजेचं आहे.
प्रिंटिंग
संगणकाचा शोध लागण्याच्या किती तरी र्वष आधी प्रिंटिंगचा शोध लागला. मात्र संगणकाच्या शोधानंतर प्रिंटिंग क्षेत्रात प्रचंड भरभराट झाली. प्रिंटिंगची सर्व प्रोसेस माहीत असणा-यालाच या क्षेत्रात जास्त वाव आहे, नाही तर केवळ सॉफ्टवेअर शिकण्यात काहीच अर्थ नाही.
प्रिंटिंगमधील टेक्नॉलॉजी माहीत असेल तरच सॉफ्टवेअर्समध्ये ग्राफीक डिझायनर्स काम करू शकतात. सध्या सृजनशील ग्राफीक डिझायनर्सची प्रचंड मागणी या क्षेत्रात आहे. त्यामुळे ग्राफीक डिझाईनचा अभ्यास करताना प्रिंटिंग प्रोसेसचा अभ्यास त्यात आहे की नाही हे पाहणे हिताचं ठरेल.
फोटोग्राफी
स्मार्ट फोन्सचा वापर वाढल्यापासून प्रत्येक जण फोटोग्राफर बनला आहे, यात काही शंकाच नाही. मात्र प्रत्येक गोष्ट या कॅमे-यामध्ये टिपता येत नाही, त्यासाठी फोटोशॉपची गरज लागतेच. लोकेशन्स बदलण्यापासून ते लाईट्स, इफेक्ट्स देण्यापर्यंत सारं काही काम या फोटोशॉपमध्ये करता येऊ शकतात.
उत्तम कंपोझिशन आणि लाईटिंग उत्तम असेल तरच फोटो चांगला येतो. जाहिरात, वेब, अ‍ॅनिमेशन, क्षेत्रात फोटोग्राफीला अतिशय महत्त्व आहे. त्याचबरोबर फोटो मिक्सिंग तसेच स्पेशल इफेक्ट्मुळे फोटोंना अधिक जिवंतपणा आलाय. फोटोशॉपमध्ये फोटो मिक्सिंग हे स्वतंत्र करिअरही होऊ शकतं. त्यामुळे परफेक्ट फोटोमिक्सिंग टेक्निक्सचा अभ्यास ग्राफीक डिझाईन कोर्समध्ये आहे.
रंगकाम
रंगसंगती जुळून येणं ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामुळे कोणतंही काम करताना त्यात रंगसंगती कशी केली आहे हे फार महत्त्वाचं आहे. जाहिरात, पोस्टर, वेबसाईटवर किंवा अ‍ॅनिमेशनमध्ये रंगसंगती चांगली झाली असेल तरच ते जास्त खुलून दिसतात. मात्र हे काम फार सोपं वाटत असलं तरी ते फार कठीण असतं. त्यामुळे ग्राफिक डिझाईन शिकताना रंगसंगतीकडे बारीक लक्ष द्यायला हवं.
वेब डिझाईन
आता सारं जग ऑनलाईन सुरू आहे. शॉपिंग करण्यापासून ते बँकिंग क्षेत्रापर्यंत सगळ्या गोष्टींसाठी आपण विविध वेबसाईट्स चेक करत असतो. त्यामुळे आता वेब डिझायनरला प्रचंड मागणी आली आहे. जाहिरात, पत्रकारिता, बँकिंग, शॉपिंग अशा विविध क्षेत्रात वेब डिझायनरचा उपयोग केला जातो.
त्यामुळे ग्राफीक डिझाईन करताना वेब डिझाईनकडेही लक्ष द्यायला हवं. इथेही इंटरनेट सर्फिग आणि वेबडिझाईन सारखी सॉफ्टवेअर्स शिकून चालत नहाी. हा विषय प्रंचड विस्तारलेला आहे. हा विषय ग्राफीक डिझाईनमध्ये असला तरी स्पेशल वेब डेव्हलपर म्हणूनही आपण आपलं करिअर करू शकतो.
अ‍ॅनिमेशन
आजच्या काळात अ‍ॅनिमेशनला प्रचंड महत्त्व आलं आहे. शिवाय ग्राफीक डिझाईन नाही कळलं तर अ‍ॅनिमेशन काहीच कळणार नाही. ग्राफीकमध्ये एक स्थिर फ्रेम असते तर अ‍ॅनिमेशनमध्ये हलती चित्र असतात. त्यामुळे अ‍ॅनिमेशन शिकायचं असेल तर ग्राफीक डिझायनचं थोडंफार ज्ञान असणं फार महत्त्वाचं आहे.

Comments

Popular Posts