विद्यार्थी दशेतील मुले 'सैराट' का होतात?


school love, sex education, school education, why students fall in love, love tringle, school love status school love song school love story status school love story movie school love quotes school love story marathi


काही महिन्यांपूर्वी दक्षिणेतील एका चित्रपटातील दृश्याने सोशल मीडियावर खळबळ उडवली होती. शाळेतील एक मुलगी तिच्यावर प्रेम करणाऱ्या मुलाला भर वर्गात डोळा मारते असे ते दृश्य होते. चर्चा झाली ती त्या मुलीच्या बोल्डनेसची, दिसण्याची आणि डोळा मारण्याची. कुणालाही वाटले नाही की शाळकरी वा महाविद्यालयीन वयात, शिकण्याच्या विद्यार्थीदशेत डोळा मारला जातोय हे गैर आहे. सैराटमध्येही शाळकरी वयातीलच प्रेम दाखवले होते. तेथेही याच प्रकारची काही दृश्ये होतीच.. त्याने प्रेम केलं तिने प्रेम केलं, तुमचं काय गेलं.. हे कवितेत म्हणायला ठिक आहे. पण जेव्हा प्रेम करण्याचे वय शाळकरी असतं, प्रेम म्हणजे प्रेम न राहाता त्याला शारीरिक आकर्षणाचे गारूड असते, नकळत्या वयात पीअर प्रेशर अर्थात समवयीन मित्रमैत्रिणींच्या दबावामुळे या गोष्टींना अपरिपक्व मन बळी पडते आणि त्यातून काही भलतेच समोर येते, तेव्हा तो सामाजिक प्रश्न बनत असतो. मोबाईल, इंटरनेट, संगणकाच्या सहज उपलब्धतेमुळे या सामाजिक प्रश्नाला समस्येचे स्वरुप प्राप्त होऊ लागले आहे. पालकांशी सुसंवाद नसेल किंवा पालकांमध्येच विसंवाद असेल तर त्याला आणखी वेगळे परिमाण मिळते. वयात येण्याचे वय जसे काही वर्षांपूर्वीच बदलले आहे तसेच मुलांमधील प्रेमभावनेचे आविष्कारही बदलले आहेत. हिंसक, आक्रमक स्वरुपात प्रेम प्रगट व्हायला लागले आहे. 
school love, sex education, school education, why students fall in love, love tringle, school love status school love story status school love story movie school love story marathi,
गृहपाठ, ट्यूशन आदी गोष्टींच्या मागे लागणारी विद्यार्थीदशेतील मुले हल्ली अफेअर, प्रेमप्रकरणांच्या मागे लागल्याने पालक, शिक्षकांनीही चांगलीच धास्ती घेतली आहे. सायनच्या शिव शिक्षण संस्थेच्या डी.एस. हायस्कूलमध्ये असाच एक प्रकार घडला आणि त्यामुळे या विषयाला वाचा फुटली. या शाळेतील एक मुलगा सतत गैरहजर राहत होता. त्याच्या गैरहजेरीमागचे कारण सापडत नव्हते. अखेर शाळेतील समुपदेशकांनी त्याच्याशी संवाद साधला आणि एक धक्कादायक बाब समोर आली. त्याची एक मैत्रीण त्याच्या मागे लागली असल्याने आणि तिच्या मैत्रिणीही सतत चिडवत असल्याने हा मुलगा नैराश्यात गेला आणि शाळेची त्याला भिती वाटू लागली. त्यातूनच त्याने शाळेत जाण्यास नकार दिला. हे झालं एक प्रातिनिधिक उदाहरण. मात्र अशी कित्येक प्रकरणे सध्या प्रत्येक शाळेत घडत आहेत. बदलत्या जगात झपाट्याने बदलत जाणारे नातेसंबंध आणि मोबाईल, इंटरनेट, सिनेमा, टीव्ही यांमुळे शालेय वयातच विद्यार्थ्यांना अनोखं एक्सपोजर मिळत असल्याने पौगंडावस्थेतच विद्यार्थी-विद्यार्थिनींमध्ये अफेअर्स-प्रेमसंबंधांचं प्रमाण वाढतं आहे. नोकरीमुळे आई वडिलांना मुलांकडे लक्ष द्यायला वेळ नसतो. त्यामुळे त्यांच्यात एक दरी निर्माण होते. या विसंवादामुळे विद्यार्थी मोबाईल, इंटरनेट या आभासी जगालाच आपला साथीदार मानतात. आणि आभासी जगातून ज्या गोष्टी शिकता येतात त्याच या खर्‍या खुर्‍या आयुष्यात आत्मसात करतात. वय वर्षे दहा म्हणजे शारीरिक, मानसिक जडणघडणीचा काळ. या बदलाच्या काळात मुलांशी बोलणं, त्यांना त्यांच्यात होणार्‍या मानसिक, शारीरिक बदलांविषयी समजावणं, लैंगिक शिक्षण देणं हे पालकांचं कर्तव्य आहे. मात्र अनेक कारणांनी घरात संवादाचा अभाव असतो आणि बाहेर नको तितके मोहजाल पसरलेले असते. मग मुलं नको त्या मार्गाला लागतात, शारीरिक आकर्षणाला प्रेम समजून वाहवत जातात, डिस्टर्ब होतात, अभ्यासाकडे दुर्लक्ष करतात. विद्यार्थ्यांमधील हा दृष्टीकोन बदलण्यासाठी त्यांच्याशी चर्चा करणं, गप्पा मारणं गरजेचं आहे. दमदाटी करून, मारून विद्यार्थ्यांना मार्गी लावता येत नाही.
school love, sex education, school education, why students fall in love, love tringle, school love status school love story status school love story movie school love story marathi,
कारण बालमन अत्यंत नाजूक असतं. या काळात मनावर झालेला आघात शेवटपर्यंत कायम राहतो. त्यामुळे त्यांच्या या हळूवार मनाला समजेल, उमजेल अशा शब्दांमध्ये त्यांना घडवणं गरजेचं आहे. हल्ली अनेक महाविद्यालयात समुपदेशन विभाग आहेत. असाच एक विभाग शाळांमध्येही असायला हवा. विद्यार्थ्यांच्या वागण्या-बोलण्यात होणारा बदल, त्यांच्या प्रगतीत होणारी घसरण पाहून शिक्षकांनी, पालकांनी आपल्या पाल्यांना समुपदेशकाकडे नेण्याची गरज आहे. एकीकडे या वयात मुलांची एकूण विचारप्रक्रिया घडत असते, मुलांची ठाम मतं तयार होत असतात तर दुसरीकडे शारीरिक, मानसिक बदलांविषयी त्यांच्या मनात गोंधळ निर्माण होत राहतो. या अडनिड्या वयात मुलांना आपल्या बदलत जाणार्‍या शरीराविषयी, बदलांविषयी पालकांकडून माहिती मिळाली की अनेक प्रश्न सुटतील असं मानसोपचारतज्ज्ञ सांगतात. या वयात लैंगिक आकर्षण निर्माण होणे हे नैसर्गिक आहे. पण या बदलांविषयी त्यांना योग्य समुपदेशनही मिळायला हवे. नाहीतर कृतीतून विकृती निर्माण होऊ शकते. बालभारती, सुलभभारती, किशोरभारती अशी इयत्तांनुसार पुस्तकांची नावे बदलत गेली. मग इयत्तांनुसार विद्यार्थ्यांमधील विचारही बदलत जाणार हे नैसर्गिकच आहे. या नैसर्गिक बदलांकडे पालक कसे पाहातात आणि मुलांशी संवाद कसा वाढवतात यावर नवी पिढी सावरणे अवलंबून आहे.



Tag-school love, sex education, school education, why students fall in love, love tringle, school love status school love story status school love story movie school love story marathi, 


x

Comments

Popular Posts