सोशल मीडियाचे सुजाण वापरकर्ते होऊया

social media, bjp era, bjp it cell, social media fake news, fake news, how to use social media, how to control social media,

एकविसावे शतक हे एका अर्थी क्रांतिकारक शतक ठरणार आहे. समाज माध्यमात झालेली क्रांती आणि या समाजमाध्यमांचा झालेला झालेला प्रभावी वापर पाहता येत्या काळात समाज माध्यम आपल्या आयुष्यातील मूलभूत घटक बनेल. मात्र या माध्यमाचा प्रभावी वापर करण्याच्या नादात आपण त्यांचा अतिरेक करतोय हे ध्यानात राहिले म्हणजे झाले. सोशल मीडियाचा सर्वात जास्त आणि चांगला फायदा झाला तो भाजप सरकारला. 2014 च्या निवडणुकीत भाजपाने सोशल मीडियावर केलेल्या प्रचाराचा फायदा आपण पहिलाच. आता लोकसभेच्या निवडणूक येऊ घातल्या आहेत. त्या पाश्वभूमीवर त्यांचं आईटी सेल पुन्हा सक्रिय झाले आहेत. शिवाय इतर पक्षांनीही या सोशल मीडियाचा जास्तीत जास्त फायदा करून घेण्यासाठी सुरुवात केली आहे. काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी निवडणुकीत प्रवेश केल्यावर त्यांच्यावर सरकारपक्षाने कडाडून टीका केली. एकमेकांवर चिखलफेक सुरु झाली. मात्र ही चिखलफेक जेव्हा अश्लिलतेवर आली तेव्हा समाज माध्यमात यावर बरीच चर्चा झाली. राहुल गांधी यांचा चेहरा आणि प्रियांका गांधी यांचे धड वापरून एक फोटो फोटोशॉप करण्यात आला. अनेक भाजप समर्थक ग्रुपवर हा फोटो व्हायरलही झाला.
social media, bjp era, bjp it cell, social media fake news, fake news, how to use social media, how to control social media,
सोशल मीडियाचा प्रभावी वापर करताना भाजपकडून झालेला हा घाणेरडा प्रचार नक्कीच क्रोधकारक आहे. सरकारी यंत्रणेकडूनच जर अश्या नीचपणाला खतपाणी मिळाले तर सतत सक्रिय असणार्‍या तरुणाईला काय बोध मिळेल? सोशल मीडियाचा गैरवापर हा फक्त राजकीय पक्षापुरता मर्यादित राहिलेला नाही. तरुणांची माथी भडकवणे, अफवा पसरवणे याहूनही पलीकडे हा प्रकार गेला आहे. काही महिन्यांपूर्वी झुंडीने जाऊन हाणामारी झाली होती. सोशल मिडियावर पसरलेल्या काही अफवेमुळे हा सामाजिक हिंसाचार घडला होता. फोरवर्डेड संस्कृती इतकी रुजली आहे की कसलाही विचार न करता संदेश इकडून तिकडे सहज फेकले जातात. संदेशामागची सत्यात तपासली जात नाही, त्यामुळे अफवांना उधाण येतं. सामाजिक हिसाचारानंतर व्हाट्स अँपने नियम कडक केले. मात्र समाजकंटकांनी कसलीही तमा न बाळगता प्रत्येक गोष्टीचा अपप्रचार करणं सुरु ठेवलं आहे. स्वयं घोषित वैद्यांनीही आरोग्यविषयक टिप्स द्यायला सुरुवात केली आहे. या टिप्स आपल्या आरोग्याशी खेळणार्‍या आहेत हे सगळ्यांना माहित असतानाही असे संदेश बिनदिक्कत पाठवले जातात. म्हणून सोशल मीडियाचा वापर व्यासपीठ म्हणून करताना आपण नक्की काय वाचतोय, फॉरवर्ड करतोय याची जाणीव असली पाहिजे. सुजाण वापरकर्ते म्हणून आपलं सगळ्यांचं ते कर्तव्यच आहे.
सोशल मीडियाचे सुजाण वापरकर्ते होऊया, social media, bjp era, bjp it cell, social media fake news, fake news, how to use social media, how to control social media,
दैनिक महाराष्ट्र दिनमान

Tags-सोशल मीडियाचे सुजाण वापरकर्ते होऊया, social media, bjp era, bjp it cell, social media fake news, fake news, how to use social media, how to control social media, 

Comments

Popular Posts