Celebrity Interview : सतत नवं शोधणं हेच आयुष्याचं उद्दीष्ट!
विविध क्षेत्रातून अभिनय क्षेत्रात स्थिरस्थावर झालेले अनेक कलाकार आहेत. मात्र भटकंतीप्रिय असलेले, सतत फिरतीवर असलेले, महाराष्ट्रातील डोंगर-दर्या पालथी घातलेले, निसर्गावर भरभरून प्रेम करणारे फार कमी कलाकार असतात. त्यापैकी एक म्हणजे मिलिंद गुणाजी. झी मराठीवरील भटकंती ही त्यांची मालिका अत्यंत लोकप्रिय ठरली होती. मधल्या काळात मिलिंद गुणाजी नेमके कुठे गेले असा प्रश्न त्यांच्या चाहत्यांना पडला होता. मात्र चाहत्यांची ही उत्सुकता जास्त न ताणता मिलिंद गुणाजी आता एक नवा कोरा चित्रपट घेऊन येत आहेत. येत्या 17 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार्या ‘मिरांडा हाऊस’मधून ते मराठीत कमबॅक करत आहेत. त्यांच्या या नव्या चित्रपटाविषयी आम्ही त्यांच्याशी मारलेल्या गप्पा.
इंजिनिअर टू अभिनेता व्हाया मॉडलिंग...
इंजिनिअर, खेळाडू मग मॉडलिंग आणि अभिनेता या टप्प्यांवच्या प्रवासाविषयी त्यांना विचारल्यावर ते म्हणाले की, ‘इंजिनिअर झाल्यावर मी स्वतःचा व्यवसाय सुरू केला. सोबतच मी क्रिकेट आणि बॅडमिंटन खेळत होतो. पण तेव्हा एक अपघात घडल्याने मला खेळापासून दूर व्हावं लागलं. तेव्हा एकाने मला सुचवलं की मॉडलिंगमध्ये काहीतरी सुरू कर. एखाद्या मॉडेलसारखे व्यक्तिमत्व असल्याने मीही त्यासाठी प्रयत्न केले. गौतम राजाध्यक्ष या प्रसिद्ध फोटोग्राफरकडे मी फोटो काढून घेतले. त्यांनाही माझी पर्सनालिटी आवडली. दुसर्या दिवशी त्यांनी काही लोकांकडे फोटो देऊन आलो. माझ्या एका मित्राकडेही अनेक एजन्सी होत्या. त्याच्याकडेही मी माझे फोटो देऊन आलो. त्यानंतर दुसर्याच दिवशी मला तिथून फोन आला. आणि एका रात्रीत माझा मॉडलिंग क्षेत्रात प्रवेश झाला.
मराठीत कमबॅक...
हिंदी चित्रपटात आपला जलवा दाखवणारे मिलिंद गुणाजी मध्यंतरी मराठी चित्रपटात दिसले नाही. मिरांडा हाऊसच्या निमित्ताने त्यांनी मराठीत कमबॅक केले आहे, त्याबद्दल ते म्हणातात की, ‘मी सतत फिरतीवर असतो. माझं मॉडलिंगही सुरू असतं. त्याचसोबत मी आता तेलगु चित्रपटसृष्टीत माझे पाय रोवतो आहे. तेलगुमध्येही माझे चित्रपट हिट ठरलेत. तसेच, बॉलिवूडमध्ये पानिपत हा चित्रपट करतोय. एक-दोन मराठी चित्रपटाचंही शुटींग सुरू आहे. या सगळ्या चित्रपटांआधी मिरांडा हाऊस हा चित्रपट जलदगतीने बनला आणि आता प्रेक्षकांसमोर येतोय. त्यामुळे या चित्रपटातून मी बर्याच दिवसांनी प्रेक्षकांना भेटणार आहे.’
चित्रपटातील भूमिका रहस्यमय...
या चित्रपटातील भूमिकेविषयी मिलिंद गुणाजी यांना विचारलं असता ते म्हणाले की ‘हा चित्रपट रहस्यपट आहे. चित्रपट उलगडत जाईल तशी माझी भूमिकाही प्रेक्षकांना उलगडत जाणार आहे. माझी भूमिका रिव्हिल होणं हेच त्या चित्रपटाचं मोठं रहस्य आहे.’
साईंकित उत्तम अभिनेता
या चित्रपटाचे दिग्दर्शक राजेंद्र तलक, अभिनेत्री पल्लवी सुभाष, अभिनेता साईंकित कामत यांच्यासोबत मिलिंद यांनी पहिल्यांदाच काम केले. त्यांच्यासोबतच्या अनुभवाविषयी सांगताना ते म्हणाले की, ‘राजेंद्र तलक आणि साईंकित कामत हे मुळचे गोव्याचे. मीही गोव्याचा असल्याने माझं त्यांच्याशी चांगलं ट्युनिंग जमलं. राजेंद्र तलक यांच्याविषयी मी आधी खूप चांगलं ऐकलं होतं. त्यामुळे त्यांनी चित्रपटाविषयी विचारणा केल्यावर मी कथा ऐकून त्यांना लगेच हो म्हणालो. तसंच, पल्लवी सुभाषला मी आधीपासूनच ओळखत होतो. फक्त तिच्यासोबत काम करण्याचा योग आला नव्हता. या चित्रपटाच्या माध्यमातून मला तिच्यासोसबत काम करण्याची संधी मिळाली. ती एक हुशार अभिनेत्री आहे. तर, साईंकित कामत या चित्रपटाच्या माध्यमातून पहिल्यांदाच सिनेसृष्टीत उतरत असला तरीही त्याच्या अभिनय कौशल्यावरून तोही उत्तम अभिनेता असल्याचं जाणवतं.
सतत काहीतरी नवं शोधायचं आणि शिकायचं

![]() |
दैनिक महाराष्ट्र दिनमान |
Comments
Post a Comment