संतसहित्यातून दुष्काळ निवारण

संत साहित्य, वारकरी संप्रदाय युवा मंच, अक्षय महाराज भोसले, संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर,

महाराष्ट्राला संतांची मोठी परंपरा लाभलेली आहे. मध्ययुगीन काळात संतांनी समाजप्रबोधनाचे काम केले. सर्वत्र अन्याय, अत्याचार होत असताना संतांनी भक्ती आंदोलन पुकारले आणि समाजाला योग्य दिशा दाखवली. संतांनी मांडून ठेवलेल्या विचारांचा आता आधुनिक काळातही उपयोग करण्याची वेळ आली आहे. कारण संतांचे माहेरघर असलेला महाराष्ट्र सध्या दुष्काळाच्या जंजाळ्यात अडकलाय. शेतकरी पूर्णपणे खंगला आहे. दुष्काळाचे सावट दूर व्हावे, गावे पाणीदार व्हावी, भरपूर शेतउत्पन्न व्हावं याकरता अनेक संघटना कार्यरत आहेत. अबालवृद्ध या संघटनांमधून शेतकर्‍यांच्या प्रश्नांवर कार्य करत आहेत. त्याचप्रमाणे संतसाहित्याच्या आधारे लोकांचे प्रबोधन करण्याचे काम महा.एनजीओ फेडरेशन आणि वारकरी संप्रदाय युवा मंच यांनीही सुरू केले आहे.
वारकरी संप्रदाय युवा मंचचे अध्यक्ष आणि संत साहित्याचे अभ्यासक अक्षय महाराज भोसले यांच्या विचारांतून या उपक्रमाला चालना मिळाली आहे. ते म्हणतात, मी मुळचा सातारा जिल्ह्यातील बिजवडी गावचा. या गावात कधीच पुरेसा पाऊस झाला नाही. त्यामुळे या गावातील दुष्काळ मी माझ्या जन्मापासूनच अनुभवला आहे. वृक्ष आणि जल संवर्धन होत नाही तोवर दुष्काळ महाराष्ट्रातून जाणार नाही असं अभ्यासाअंती सिद्ध झालं. दरम्यान पाणी फाऊंडेशनचं काम उभं राहिलं. या कामाचं यशही पाहिलं. म्हणूनच आपल्याला जमेल त्या पद्धतीने वृक्ष, जल संवर्धनाचे प्रबोधन करायचे ठरवले. राज्याचे जल संधारण विभागाचे सचिव प्रभाकर देशमुख, आर्ट ऑफ लिव्हिंगचे महाराष्ट्रचे सल्लागार शेखर मुंदडा यांचीही भेट घडून आली. दोघांचेही या क्षेत्रातील काम अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. यांच्याशी बोलल्यानंतर आपल्याला जमेल त्या पद्धतीने दुष्काळ निवारणासाठी किर्तनाच्या माध्यमातून प्रबोधन करायचे निश्चित केले. तसेच, श्रीगुरु चैतन्यमहाराज देगलूरकर व प्रमोदमहाराज जगताप यांचेही मार्गदर्शन लाभले. याची सुरुवात माण तालुक्यातील मोगराळे गावातून केली. तेव्हा विजय वरूडकर आणि शशिकांत काटे यांनी प्रचंड प्रोत्साहन दिले.
तुकाराम महाराज यांच्या काळातही दुष्काळ पडला होता,  मात्र ते दुष्काळापुढे हारले नाहीत.  उलट बरे झाले देवा निघाले दिवाळे श्र बरी या दुष्काळे पिढा केली श्रश्र असे सांगत त्या दुष्काळाचा मुकाबला केला. संतांनी दिलेल्या पर्यावरण रक्षणाच्या संदेशाकडे आपण दुर्लक्ष केल्याने आपल्यावर दुष्काळाचे संकट कोसळले आहे. सातशे वर्षांपूर्वी ज्ञानेश्वर महाराज यांनी आपल्याला सांगितले होते की, 
नगरेचि रचावी | जलाशये निर्मावी | महा वने लावावी | नानाविध||
 या संत वचनाप्रमाणे आपणही जलाशयाची निर्मिती केली असती  आणि विविध प्रकारची महावने लावली असती तर आताचे दुष्काळाचे संकट ओढवले नसते, संतसाहित्याचा जनमाणसांत हवा तेव्हढा प्रसार न झाल्यानेच ही परिस्थितीत ओढावल्याची खंत अक्षयमहाराज व्यक्त करतात.
संत साहित्य, वारकरी संप्रदाय युवा मंच, अक्षय महाराज भोसले, संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर,
गावे पाणीदार करायेच असतील, शेतं हिरवीगार करायचे असतील तर शेतीविषयक सखोल अभ्यास होणंही गरजेचं आहे. त्याचप्रमाणे ज्या गावात जाऊन प्रबोधनाचे काम करायचे आहे, त्या  गावातील संपूर्ण भौतिक माहिती घेतली जाते. गावातील स्वयंसेवकांशी चर्चा केली जाते. त्यानंतर गावातील लोकांचं दुष्काळाशी सामना करण्यासाठी किर्तनाच्या माध्यमातून मनोबल वाढवलं जातं. संत तुकाराम महाराज, संत  दामाशेट्टी मंगळवेढेकर, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातही दुःष्काळ होता. मात्र ते ज्या पद्धतीने या परिस्थितीला सामोरे गेले तसे आपणही या परिस्थितीला तोंड देणे गरजेचे आहे, हे पटवून दिले जाते. 
व्हॉट्सअ‍ॅप व फेसबुकच्या अक्षयवारीच्या माध्यमातून रोज या संदर्भातील अभ्यासपूर्ण पोस्ट्स जवळपास 10,000 हुन अधिक लोकांपर्यंत नियमित पोहोचल्या जातात. आतापर्यंत सोलापूर, सातार, बीडमधील 30 हून अधिक छावण्यापर्यंत समाजप्रबोधनाचं काम झाल्याचं अक्षय महाराज यांनी सांगितले. 
संत साहित्य, वारकरी संप्रदाय युवा मंच, अक्षय महाराज भोसले, संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर,
लेकरां फारच गोड सांगतूस बघ, आम्हाला नव्हतं इतकं समजत. पण तू सांगतूस ते खरं हाय बघ. आधीच्या येळेत आम्हीबी झाड लावूंनशी जगवली असती तरीबी आज इथं समदं हिरवं असत बघ. पण नाय जमलं बग तवा. पण आता करु आम्ही आमची लेकरं व नातवंडबी करतील बर, वयाच्या सत्तरीकडे झुकलेल्या आजीबाई अक्षयमहाराज भोसले यांचं कौतुक करत होत्या. डोळ्यात समाधानाचे भाव आणून अक्षय महाराज हे सारं सांगत होते. 
संत साहित्य, वारकरी संप्रदाय युवा मंच, अक्षय महाराज भोसले, संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर,
या किर्तनांना वयाच्या आठव्या वर्षापासून ते अगदी 80 वर्षांपर्यंतचे गावकरी येतात. आपल्या गावातील दुष्काळ दूर करायचा असेल तर आपल्याला एकत्र यायलाच हवं असं गावकर्‍यांच्या मनात बिबंवलं गेलं आहे. निसर्गाची पूजा केली, वृक्षवेलींना जपलं, पाण्याचा सदुपयोग केला तर आपल्याला दुष्काळाचे चटके लागणार नाहीत हे लोकांना आता कळून चुकलंय. किर्तनातून प्रबोधन करण्याची महाराष्ट्राची जुनी परंपरा आहे. काळानुरुप किर्तन सेवकांनी आपल्या किर्तनांत बदल करून तत्कालीन संदर्भ घेऊन लोकांना योग्य मार्गावर आणलं आहे. जेव्हा जेव्हा महाराष्ट्रात महाराष्ट्रात आपत्ती, संकटं आली तेव्हा या प्रबोधनकारांनीच जनमाणसांना सावरलं आहे. आणि आता महाराष्ट्राला दुष्काळाला घेरलं असताना किर्तनकारांनी पुन्हा आपलं प्रबोधनाचं काम हाती घेतलं आहे. या कामाला उत्तरोत्तर यश मिळो याच सदिच्छा.

संत साहित्य, वारकरी संप्रदाय युवा मंच, अक्षय महाराज भोसले, संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर,
दैनिक महाराष्ट्र दिनमान

Comments

Popular Posts